‘चे’ गव्हेराचे लिखाण हा जणू क्रांतिकारी भूतकाळातून क्रांतिकारी भविष्याकडे वाहत असलेल्या प्रवाहात सोडून दिलेल्या बाटलीतला संदेशच
‘चे’ गव्हेरा हा मनुष्य भविष्यात जगला. भांडवल आणि साम्राज्य यांनी घडवलेल्या जगाशी कायमचा विद्रोह करत जगला. अशा जगाचं क्रांतिकारक परिवर्तन करणारा सैनिक म्हणून जगला. साम्राज्यवादाने आणि त्याच्या हस्तकांनी त्याची हत्या केली, तेव्हा ‘चे’ होता अवघा ३९ वर्षांचा. अनेक जणांच्या जीवनाची ऊर्जा सामावून वेगाने आकाशात भ्रमण करणारा तो ताराच होता. तो जिवंतपणीच गनिमी युद्धतंत्रातील एक दंतकथा बनून गेला.......